दिवाळी संच
Diwali Sancha will be shipped on 7th November 2026.
१८५० रुपयांचा म. टा - मॅजेस्टिकचा दर्जेदार दिवाळी संच फक्त १४५० रुपयांत. यात समावेश आहे ५ दर्जेदार दिवाळी अंकाचा. दीपावली, महाराष्ट्र टाइम्स, ऋतुरंग, अनुभव, अक्षर,. याशिवाय... 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' ने नवीन प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक नोंदणी करून संचाबरोबर मिळवा. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या. खालील चार पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडा.
Please select any one book with this Diwali Sanch
पुस्तकाचे नाव - कानोकानी
लेखकाचे नाव - डॉ. बाळ फोंडके
मूल्य :- ३००/-
आपण जगतो त्यापाठी 'आहार निद्रा भय मैथुनं च' या सर्वच प्राणिमात्रांच्या मूलभूत प्रेरणा असल्या तरी त्यांच्यावर आपल्या अधिवासाचा, सामाजिक परिस्थितीचा, राजकीय बैठकीचा प्रभाव कळत नकळत पडत असतोच. या सर्वच धारणांची चिकित्सा वैज्ञानिक दृष्टिकोणातून करणं त्यापायीच अनिवार्य झालं आहे.
त्यासंबंधीचं अद्ययावत ज्ञान उपलब्ध जरूर आहे. पण दुर्दैवानं ते वैज्ञानिक परिभाषेच्या क्लिष्ट जंजाळात अडकून पडलं आहे. तुम्हा आम्हाला त्याचं आकलन दुष्प्राप्य झालं आहे. त्यातली गूढता बाजूला सारून आपल्याला सहज समजेल अशा तऱ्हेनं ते पोचवण्याचा हा प्रयत्न.
ललित शैलीच्या अंगानं विज्ञानातील सूत्रांचा परिचय करून देण्याचा प्रयास गेली काही वर्ष डॉ. बाळ फोंडके करत आहेत, अशाच काही लेखांचा हा संग्रह.
पुस्तकाचे नाव - लाइफ सेव्हर
लेखकाचे नाव - विवेक गोविलकर
मूल्य :- ३००/-
कॉर्पोरेट क्षेत्रातल्या माणसांच्या जीवनावर आधारित कथा आणि कादंबरी लेखन यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विवेक गोविलकर यांच्या 'लाइफ सेव्हर' या नव्या कथासंग्रहात विज्ञान काल्पनिका, शोधकथा, मनोविश्लेषण, नोस्टॅल्जिया अशा काही वेगळ्या शक्यता हाताळलेल्या आहेत. त्यातून त्यांनी आपल्या कथांचा पट अधिक विस्तृत केलेला आहे. जागतिक भव्य राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाचे परिणाम, शंभर वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक इतिहासातल्या विस्मृतीत गेलेल्या घटना आणि त्यातून उलगडणारे अवघडलेले सत्य, व्यावसायिक आणि वैयक्तिक नात्यांमधे गल्लत केल्याने होणारी फसवणूक, तरुण गायक कलावंताची अस्वस्थता, सक्रिय आयुष्याच्या उत्तरार्धात येणारे वैफल्य, वैयक्तिक आणि समूहाच्या प्रतिक्रिया, या आणि अशा गोष्टी या कथांमधून समर्थपणे वाचकांसमोर येतात. उत्कंठावर्धक घटना आणि चपखल संवाद असलेल्या या वेगवेगळ्या बाजांच्या कथांमध्ये मानवी मनाचा शोध हे सामाईक सूत्र आहे. अस्सल वातावरणनिर्मिती, बारीकसारीक तपशिलांमधून समर्थपणे उभी राहणारी पात्रे आणि त्यांच्या मनोव्यापारांचे उत्तम चित्रण हे गोविलकर यांच्या कथांचे सामर्थ्य आहे. या कथांचा फक्त चेहराच नाही तर आशय आणि गाभादेखिल • आधुनिक आहे. अशा पाच कसदार दीर्घकथांचा हा संग्रह.
पुस्तकाचे नाव - सिनेमॅटिक
लेखकाचे नाव - गणेश मतकरी
मूल्य :- ३००/-
सिनेमॅटिक हे फॅशनेबल पुस्तक नाही. त्याचा जन्म
फॅशनमधून न होता सिनेमाच्या पॅशनमधून झाला आहे.
मतकरींचा पिंड सिने-खानदानी आहे. ते सिने-सोसायटी,
आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स, सिनेमाचा इतिहास ह्या साऱ्यांच्या
संस्कारातून वाढले आहेत, पण त्यात गुंतून मात्र राहिले
नाहीत. त्यांचा सिनेमाचा शोध हा सिनेमावर प्रेम करणाऱ्या
एका डोळस रसिकाचा आहे. त्यांना मोठ्या पडद्यावरच्या
सिनेमाचे महत्त्व कळते आहे. त्याची भव्यता, त्यातल्या सूक्ष्म
भावच्छटा, रंगछटा आणि ध्वनीच्या विस्तृत झालेल्या सीमा
त्यांना जाणवतात. त्याचबरोबर आजच्या छोट्या पडद्याच्या
आणि सिनेमाप्राय लहानशा प्रतिमांच्या पोटात महान
भविष्यकाळ दडला आहे ह्याचीही त्यांना जाणीव आहे.
सिनेमॅटिक हे पुस्तक नेटवरून डाऊनलोड केलेल्या
माहितीने भरलेले पुस्तक नाही. ते एका सिनेमावर प्रेम करणाऱ्या
आणि त्याचा वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे प्रकट
चिंतन आहे. ते वाचताना आपण २०११ साली लिहिलेले
सिनेमावरचे एक भाष्य वाचतो आहोत ह्याची जाणीव पदोपदी
होते. हे साल ह्या पुस्तकाच्या केवळ प्रसिद्धीचे साल नसून
लेखकाच्या मानसिक वातावरणाचे द्योतक आहे. हे पुस्तक
खरोखरीच आजचे सिनेमावरचे पुस्तक आहे.
- अरुण खोपकर
पुस्तकाचे नाव - कोरा कागद पर्पल शाई
लेखकाचे नाव - मिलिंद बोकील
मूल्य :- ३००/-
काही वेळ मी नजर न हलवता नुसती बघत राहिले.
मला कळलं, हे माझ्यासाठी स्वर्गातून आलेलं आश्वासन आहे.
फक्त माझ्यासाठी. इथे, माझ्याच घरात.
मला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही.
कोणत्याही मळलेल्या वाटेनं हिंडायचं नाही.
ना कोणाच्या परवानगीची गरज, ना कोणाच्या नजरेचा जाच.
मी जशी होते, जिथे होते, तिथे उतरला आहे हा आशीर्वाद.
गेली पंचवीस वर्षं ह्या कुमारिकेनं तपश्चर्या केली या गरम, उन्हाळी प्रदेशात !
ऊन खात, वारे सोसत! तिचं फळ आहे हे.
उत्तरेकडच्या हिमाच्छादित पर्वतातून अवतरलेलं.
की स्वतः तो कैलासच उतरलाय इथे?
माझ्या कन्याव्रताची सांगता करायला?
आता मी ह्याचा स्वीकार न करू, तर काय करू?
Buy Now