200 170.00 15 % Off save 30
Language: marathi
Category: Marathi Books
Sub Category: नाटक
Publication: Popular Prakashan
Pages: 110
Binding: paperback
Dispatched in 1 to 3 days.
Book Description : "एकादशावतार, बुद्रूकवाडीचा मारुती बाटला आणि जाळियेली लंका या प्राजक्त देशमुख याच्या तीन दीर्घांकांचं हे पुस्तक. प्रयोग मी पाहिले आहेत; या तीनही प्रयोगांमध्ये दिसलेला सामाजिक भाग ही खरंतर प्रयोगाइतकीच लेखनाचीही ताकद आहे. या तीनही दीर्घांकांमधील सामाजिक आशय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सार्वकालिक आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक या सहितांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करेल. उत्तम संहितेचं हेच खरं द्योतक आहे. प्राजक्त पुराणातली आपल्या कल्पनेतली पात्रं, आपलं सामाजिक भान अधोरेखित करण्यासाठी वापरत आहे, असं सतत जाणवत राहतं; आणि या तीन दीर्घांकांत तो असं करण्यात यशस्वी झाला आहे. प्राजक्तची समाजाकडे बघण्याची विशिष्ट प्रकारची दृष्टी आहे. त्या दृष्टीत थोडासा तिरकसपणा आहे. आपला मुद्दा मांडत असताना तो आजूबाजूचा परिसर जिवंत करतो, ही त्याची खासियत आहे. ह्या दीर्घांकांत लिहिला गेलेला शब्द हा भवताल, भाषेची गंमत आणि दृश्य घेऊन येतो. आजच्या काळातल्या अतिशय सक्षम अशा नाट्यलेखनाचं हे दीर्घांक एक उत्तम उदाहरण आहेत. हे तीन दीर्घांक वेगळा प्रयोग आणि काळानुसार बदलत जाणारं सामाजिक भान नव्यानं देत राहतील. हे दीर्घांक पुस्तकरूपात येणं ही प्रयोगशील रंगभूमीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. — विजय केंकरे (ज्येष्ठ दिग्दर्शक)"